Thursday, May 27, 2021

Creative Confidence : Creativity वाढवण्याच्या पॉवरफुल टिप्स




तुम्ही creative आहात का? बऱ्याच लोकांना असे वाटते आपण creative नाही. बऱ्याच जणांचं असं म्हणणे असते कि artist, designer, musician, animator, architect हे लोक creative असतात.
तुमचं देखील असं मत असेल तर हा ब्लॉग पूर्ण वाचा. तुमचे मत बदलून जाईल. प्रत्येक व्यक्ती creative होऊ शकते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही position ला असाल तुम्ही तुमच्या कामाला creative करू शकता. कामात नवीन गोष्टी आणल्यामुळे लोकांचे काम सोपे होत असेल तर त्याला देखील creativity मानले जाते. creative confidence म्हणजे नवीन idea design करणे आणि त्याला implement करण्याची ability असणे. creative confidence मुळे unlimited possibilities create होतात.
creative होण्यासाठी खालील गोष्टी करून पहा.  


1. विचार करण्याची पद्धत बदला :-

 


Product design करताना Human touch राहून जातो. नेहमी technical आणि business side वर फोकस केला जातो. Successful Product चे सीक्रेट म्हणजे practical Technology , Sustainable business आणि लोकांसोबत empathy  या तिन्ही factors मध्ये balance करणे आहे. इथे आपण एक उदाहरण पाहू. 
डग यांनी न्यू हायटेक एम आर आय मशीन बनवले आहे. ही मशीन इंटरनॅशनल डिझाइन एक्सलन्स साठी नॉमिनेट झालेली आहे. एक दिवस ते ज्या हॉस्पिटलमध्ये मशीन इन्स्टॉल केले होते तिथे visit करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की एक लहान मुलगी या मशीन मध्ये आत जाण्यासाठी घाबरत होती. शेवटी डॉक्टरांना anesthesiologist ना बोलवावे लागले. हे बघून डग निराश झाले. ही मशीन ज्यांच्यासाठी बनवली आहे त्यांना जर आवडली नाही तर हा फेल्‍युअर आहे असे त्यांना वाटू लागले. पण आता ते परत redesign करू शकत नव्हते. कारण एवढा मोठा फायनान्स नंतर मिळणे कठीण होते. तेव्हा त्यांनी क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स ही concept वापरली आणि त्या मशीनचे बाहेरील डिझाईन चेंज करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी त्याला बाहेरून pirate ship चे (वरती image मध्ये दाखवल्याप्रमाणे ) डिझाईन दिले आणि ती पूर्ण रूम देखील त्याप्रमाणे paint करून एकाच थीमची केली.  आता मुलांना त्या मशीन मध्ये जाण्यास भीती वाटत नव्हती. उलट ते त्यांना amusement park वाटू लागले आणि एमआरआय करून घेणे त्यांना आवडू लागले. यावरून हे लक्षात येते की कोणत्याही इंडस्ट्रीसाठी human centered design खुप important आहे.  Human empathy चा विचार होणे गरजेचे आहे.
"New opportunities for innovation open up when you start the creative problem-solving process with empathy toward your target audience."


2. भीतीवर मात करा : 


तुमची सगळ्यात मोठी भीती कोणती आहे जी तुम्हाला creative बनू देत नाही. नवीन काही करण्यासाठी तुम्ही घाबरता का?
नवीन एखादी idea implement करण्यासाठी बरेचदा लोक घाबरतात. त्यांना fear of failure असतो. त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी पहिले पाऊल उचलले जात नाही.
जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट try करणार नाही तोपर्यंत कोणतीही भीती कमी होणार नाही. पहिलं पाऊल उचलून तर बघा हळूहळू भीती पळून जाईल आणि ते काम करण्यात आनंद मिळू लागेल. क्रिएटिव्ह जीनियस देखील fail होतात पण failure च्या भीतीने ते मागे हटत नाहीत. Failure आला तरी त्याला learning opportunity समजून त्यावर मात करतात. Secret हेच आहे की आपल्या mistakes वरून शिका. Failure ला learning opportunity समजा.

3. तुमच्यातला Spark शोधा आणि त्यावर काम करा :-  



सुरुवातीला कदाचित तुमच्याकडे clear idea नसेल, experience देखील नसेल. पण जसे तुम्ही तुमच्या आयडिया वर काम चालू कराल , research कराल तसे तुम्हाला त्यामध्ये तुमचा spark सापडेल आणि काम करण्यास इंटरेस्ट येईल. हळू हळू त्यात यश देखील मिळेल.     
Embrace Innovations  ही incubator बनवणारी कंपनी आहे. जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. फायनान्स नव्हता, मेडिकल field मधला experience नव्हता पण त्यांनी काम केले. त्यामध्ये रिसर्च केला, लोकांची डिमांड काय आहे हे जाणून घेतले. आज ह्या कंपनीने वर्ल्ड वाईड अनेक एनजीओ सोबत tie-up केले आहे. global distribution agreement sign केली आहे. 
त्यांनी असा incubator बनवला जो carry करायला easy जाईल. त्यांनी गावोगावी जाऊन अनेक गरीब मुलांचे जीव वाचवले. जेव्हा काम चालू केले तेव्हा चार लोकांची टीम होती. जी पुढे मोठी कंपनी बनली. हा स्पार्क येण्यासाठी काही स्ट्रॅटेजी आहेत ज्या आपण वापरू शकतो.
. Creative बना. तिथूनच तुमच्यासाठी काहीतरी नवीन घडण्याची प्रोसेस चालू होईल.

. प्रत्येक गोष्टीला नवीन Perspective ने बघा. नवीन idea साठी आपला mind open करण्याची आवश्यकता आहे. लाईफ मध्ये new experience चा शोध घ्या.

. Mediocrity तून वरती या. जरी वेळ लागला तरी चालेल पण एक्सप्लोर करा.

. आपल्या कस्टमर सोबत empathy ठेवा. कोणताही प्रॉडक्ट बनवण्यापूर्वी स्वतःला कस्टमरच्या जागी ठेवून विचार करा. त्याच्यासारखं पाहण्याचा, विचार करण्याचा,  feel करण्याचा प्रयत्न करा.

. जे rules बनलेले आहेत त्याला चॅलेंज करा. प्रश्न विचारण्याची सवय करून घ्या. यामुळे आपल्याला प्रॉब्लेम बद्दल खोल विचार करण्यासाठी मदत होईल.

4. फक्त planning करू नका त्यावर action घ्या.


बऱ्याच idea अशा असतात त्यावर आपण planning करतो पण आज करू, उद्या करू, हे झाल्यावर करू , ते झाल्यावर करू असे करण्यात खूप वेळ घालवतो. तेवढ्यात मार्केट मध्ये ती आयडिया दुसरे कोणीतरी घेऊन येते. त्यामुळे planning नंतर जास्त वेळ न घालवता त्यावर लगेच काम चालू करा. त्यामध्ये सुधारणा करत रहा. एक दिवस तुमचे प्रॉडक्ट excellent बनेल.  हार न मानता त्यावर काम करत राहा.      
. Do something mindset adopt करा.
. Prototype create करा.
. Potential customers कडून feedback घ्या आणि त्यांची गरज ओळखा.
. अधिक effectively innovation करण्यासाठी time limit चा नीट वापर करा.
. Planning stage मध्ये जास्त वेळ घालवू नका. त्यावर लवकरात लवकर action घ्या.

Conclusion -
Creativity सगळ्यांकडे असते. फक्त त्याला explore करण्याची गरज असते.
. नवीन काहीतरी विचार करणे आणि ते बनवू शकणे म्हणजेच creativity.
. Creative बनण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या भीतीचा सामना करा.
. Creative होण्यासाठी बाहेर जावून नवीन अनुभव घ्या.
अधिक creative बनण्यासाठी दुसऱ्या लोकांसोबत काम करा.
. तुम्हाला एखादी कल्पना सुचली आणि ते व्हावे असे वाटत असेल तर ते तुम्हीच करून टाका. दुसरं कोणी करण्याची वाट पाहू नका.
. आपले passion आणि पैसा यामध्ये balance ठेवा.

तुम्ही हा लेख पूर्ण वाचला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.

अशा अनेक विषयवार अधिक जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आणि समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि community join करा.  

Join Community

  

You can also read -