Friday, October 30, 2020

इच्छाशक्ती वाढवण्याचे ७ शक्तिशाली उपाय

 

तुम्ही motivation घेऊन एखादे काम हातात घेतले आहे आणि काही दिवस ते केल्यानंतर focus कमी झाला, मग कामाचा स्पीड कमी होऊन आपल्याला जे करायचे आहे ते करू शकलो नाही हा अनुभव तुम्हाला आला आहे का?

एखादे काम हातात घेतल्यावर काही काळाने आळस येतो आणि ते काम पूर्ण होतच नाही असे तुमच्यासोबत होत आहे का ? असे जर असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला इच्छाशक्ती वाढवण्याचे ७ शक्तिशाली उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचा आळस एकदम पळून जाईल आणि तुमची productivity वाढेल. त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.

एखादे काम चालू करण्यासाठी मोटिवेशन हे महत्त्वाचे आहे पण फक्त मोटिवेशनने काही होणार नाही. मोटिवेशनचा इफेक्ट हळूहळू कमी होऊन तुम्ही पुन्हा मूळ पदावर याल. कामाची चालढकल चालू होईल. मोटिवेशन घेऊन देखील असे का होते, कारण मोटिवेशन सोबत इच्छाशक्ती देखील तेवढीच महत्वाची आहे. फक्त मोटिवेशनने तुम्ही काही करू शकत नाही. त्यासोबत इच्छाशक्ती असायलाच हवी. आता तुम्ही म्हणाल ही इच्छाशक्ती आणायची कुठून?  इच्छाशक्ती नामक हिरा आपल्यामध्ये उपजतच असतो. फक्त आपल्याला त्याला पैलू पाडावे लागतात. प्रयत्नपूर्वक इच्छाशक्ती वाढवावी लागते. खाली दिलेले सात उपाय तुमची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतील.

१. आजचे काम आजच करा :-


कोणतेही काम आल्यावर आपण विचार करतो उद्या मला जास्त वेळ असेल तर मी हे काम उद्या करतो. पण लक्षात ठेवा उद्या कधीच येत नाही. या सवयीमुळे कामाची चालढकल होते. अशा प्रकारे कामाची चाल-ढकल होऊ नये यासाठी स्वतःला प्रश्न विचारा हे काम  मी आजच कसे करू शकतो? आणि ते आजच करून टाका. तुम्ही काम पुढे ढकलत राहिला तर कामाचा load वाढेल आणि मग काम करण्याची इच्छा हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे आजचे काम आजच करा. म्हणतात ना," कल करे सो आज कर, आज करे सो अब".

२. स्वतःला Reward द्या :-

जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी रिवॉर्ड मिळणार असतो तेव्हा dopamine नामक केमिकल release होते आणि ते काम करण्यासाठी उत्साह वाढतो. त्यामुळे प्रत्येक काम (किंवा goal) संपवल्यानंतर स्वतः ला reward द्या. काम कम्प्लीट करण्यासाठी आणि motivated  राहण्यासाठी हा उपाय करा. Dopamine detective बना आणि स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करा.

३. नियमित व्यायाम करा :-



व्यायामाचे अनेक फायदे आहेत. रोज व्यायाम केल्याने stress कमी होतो. व्यायामामुळे आपली एनर्जी दिवसभर टिकून राहण्यासाठी मदत होते. दिवसभर आपण ताजेतवाने राहतो. त्याचबरोबर unhealthy cravings कमी होतात. आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी व्यायामाची खूप मदत होते. त्यासाठी नियमित व्यायाम करा. 


४. इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्या :-

आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला त्याप्रमाणे प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यासाठी आत्म जागरुकता (self awareness ) खूप महत्त्वाची आहे. Self awareness आपल्या इच्छा शक्तीला योग्य direction देते. रोज मेडीटेशन केल्याने self-awareness वाढतो. तसेच निर्णय क्षमता आणि  आत्म निग्रह (self control ) वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे रोज मेडिटेशन (ध्यान) करणे खूप गरजेचे आहे.

५. आत्म  निग्रहाला (self control) आव्हान द्या :- 

एखाद्या गोष्टीची तुम्हाला जास्त craving होत असेल तर स्वतःला त्याचे तोटे काय आहेत ते सांगा. ती सवय सोडल्याने काय फायदे होणार आहेत ते मनाला पटवून द्या. छोट्या छोट्या गोष्टी ठरवून आपल्या craving ला नाही  म्हणायला शिका. उदा. जर तुम्हाला स्वीट जास्त खाण्याची सवय आहे. ही सवय मोडायची आहे तर हे स्वीट येता-जाता समोर दिसेल अशा जागी ठेवा आणि स्वतःला चालेंज करा समोर दिसले तरी मी खाणार नाही. सुरुवातीला तुम्हाला थोडे खाण्याची इच्छा होईल, पण तुम्ही निग्रह करून रोज हे करायला चालू केले तर कालांतराने तुम्हाला स्वीट खाण्याची इच्छा कमी होईल. ती craving नाहीशी होईल. त्यामुळे तुमचा self-control develop होईल आणि इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मदत होईल.

६. शिस्तप्रियता (Self Discipline) :-

प्रत्येक successful व्यक्ती हा शिस्तप्रिय असतो. वैयक्तिक वाढ (personal growth) होण्यासाठी शिस्तप्रिय असणे खूप गरजेचे आहे. ज्याप्रमाणे biceps वाढवण्यासाठी त्याला एक लिमिट पर्यंत exert करावे लागते. रोज त्यावर काम करावे लागते, त्याप्रमाणे शिस्तप्रियता देखील वाढवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला शिस्तप्रिय होण्यासाठी मनाला देखील शिस्त लावावी लागेल. आळशीपणा घालवण्यासाठी मनाला शिस्त लावा. जर तुम्ही शिस्तप्रिय असाल तर जरी तुम्हाला थकवा किंवा कंटाळा आला असेल तरी तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी करालच. शिस्तप्रिय असल्याने कामं वेळच्या वेळी होतात आणि आपली इच्छा शक्ती वाढण्यास मदत होते.

७. विचारांवर कंट्रोल करा :- 



आपण जसे विचार करतो तसे आपल्याला feel होते. जर आपण विचार केला की मी weak आहे  तर तसेच वाटू लागते. एखादे काम करत असताना कधीकधी आपल्याला boring आणि dull वाटू लागते. ते काम करण्याची इच्छा राहत नाही, आणि अशावेळी आपल्याला जवळच्या फ्रेंडचा कॉल आला तर अचानक एकदम fresh वाटू लागते.  तेव्हा आपल्याला dullness किंवा कंटाळा जाणवत नाही. क्षणात हा बदल कसा होतो? कारण थकवा किंवा कंटाळा असे काहीच नसते. ही आपल्या मनाने बनवलेली एक स्थिती असते. त्यामुळे आपल्या आवडीचा विषय आला की लगेच मूड चेंज होतो. आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे आपली maximum energy drain होते आणि काम करण्याची इच्छा कमी होते. हे होऊ नये यासाठी आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारावर कंट्रोल असणे गरजेचे आहे. प्रत्येक विचार हा पॉझिटिव्ह असला पाहिजे याची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या मनाला शिस्त लावणे गरजेचे आहे. मनाने आपल्यावर कंट्रोल करण्याआधी आपण मनावर कंट्रोल केले पाहिजे. कंटाळा येणे ही आपण बनवलेली मनाची स्थिती आहे हे ओळखून अशावेळी हा कंटाळा दूर फेकला पाहिजे आणि कामावर focus करायला हवे त्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल.

या ७ उपायांवर तुम्ही काम करत राहिला तर नक्कीच तुमची इच्छाशक्ती वाढेल. लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. जर तीव्र इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून इच्छाशक्ती वाढवण्यासाठी लगेच प्रयत्न चालू करा आणि तुमच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा. 

तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचला त्याबद्दल मनापासून आभारी आहे. 

अशा अनेक विषयवार अधिक जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आणि समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि community join करा.  


Sunday, October 4, 2020

व्यवसायात संधी निर्माण करण्यासाठी महत्वाचे ५ घटक

 

कौशल्ये वापरून त्यातून व्यवसाय उभा करायचा आहे पण योग्य संधी मिळत नाहीत  हा अनुभव तुम्हाला आला आहे का? काय म्हणता ...? तुम्हाला जाणून घ्यायचे आहे व्यवसायात महिलांना संधी कशा निर्मण  करता येतील ? त्यासाठी कोणते घटक आहेत ज्याचा विचार करावा लागेल ? महिला उद्योजकता दर कमी असण्याचे कारण कमी प्रमाणात आर्थिक सहभाग आणि संधी हे आहे. मागील लेखात (Click Here) आपण जाणून घेतले व्यवसायात महिला कमी प्रमाणात असण्याची  कारणे.  आता आपण जाणून घेऊ  व्यवसायात संधी निर्माण करण्यासाठीचे महत्वाचे घटक कोणते?   ज्यामुळे अधिक महिला व्यवसायात  उतरू शकतील  आणि त्यामध्ये यश मिळवू शकतील हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक आहात का? त्यासाठी हा ब्लॉग   पूर्ण  वाचा. 

व्यवसाय करण्यास सक्षम बनवणे:

 


महिलांना अनुभव आणि ज्ञान मिळविण्यात मदत करेल असे उपक्रम आवश्यक आहेत ज्यामुळे त्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यास सक्षम केले जाईल. शिक्षण हा देखील एक मुद्दा आहे. पूर्वी,विशेषत: महानगरांच्या  बाहेरील महिलांना त्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण मिळू शकत नव्हते.परंतु इंटरनेटमुळे दिवसेंदिवस जग जवळ येत आहे आणि यापुढे काहीही आवाकाच्या किंवा  मर्यादेबाहेर नाही. शिक्षण आणि कौशल्ये आता सहज ऑनलाइन मिळू शकतात. कर्मचार्‍यात सामील होवून महिलांना त्यांचे प्राप्त कौशल्य वापरण्यास प्रोत्साहित करणे महत्त्वपूर्ण आहे.   

प्रेरणा : 


महिला उद्योगिनींना नकारात्मक दृष्टिकोनाला सामोरे जावे लागते. उद्योगिनींमध्ये जागरूकता  वाढविणे आवश्यक आहे,तथापि, मानसिकतेत बदल होण्यास वेळ लागतो. नवीन रोल मॉडेल्स  समोर आले की सिद्ध केले जावू शकते की अनुरुपतेने हे करणे शक्य आहे. विविध माध्यमांमध्ये त्यांच्या यशोगाथा सामायिक केल्याने व्यवसाय देखील स्त्रीचे  जग बनू शकते याची प्रेरणा आणि पुरावा मिळतो आणि म्हणूनच महिला उद्योगिणींचा आत्मविश्वास बळकट होतो. 

नेटवर्क वाढवण्याची आवश्यकता :


भारतातील  महिला उद्योगिणींना वित्त व नेटवर्कमध्ये अधिक चांगल्या प्रवेशाची आवश्यकता आहे.  महिला आयोगाचे महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म, तसेच, काही संस्था महिला उद्योजकांना  समर्थन प्रदान करतात. ते  त्यांना त्यांच्या उद्योगातील संबंधित लोकांशी जोडतात  आणि स्वत: महिला  उद्योजकांमध्ये  नेटवर्किंग वाढवतात, जेणेकरून ते  एकमेकांच्या अनुभवावरून शिकू शकतात. शिवाय, ते कसे खेळपट्टीवर पडायचे हे शिकवून  आणि संभाव्य गुंतवणूकदारांशी त्यांना जोडण्याद्वारे ते निधी उभारणीस मदत करतात. महिला  उद्योगिणींसाठी Seed फंडाची  उपलब्धता करणे फायद्याचे आहे.  

कुटुंब आणि समाजातून समर्थन :


महिला उद्योगिणींना त्यांच्या उद्योजक महत्वाकांक्षासाठी त्यांच्या कुटुंबिय आणि समाजातून अधिक समर्थनाची  आवश्यकता असते. घरगुती आणि काळजी कर्तव्ये ही महिलांची एकमेव जबाबदारी म्हणून  समजली जाऊ नये.  याव्यतिरिक्त,महिला उद्योगोणींना  प्रसूती लाभ देणे, मुलांची देखभाल करण्यास काही सोयी उपलब्ध करणे आणि सामाजिक स्वीकृती वाढविणे यामुळे त्यांना त्यांच्या उद्योजकाची कार्यपद्धती आणि  कौटुंबिक  जबाबदाऱ्या  एकत्रित  करण्यास मदत  होईल.  मी म्हणेन की वैयक्तिक आणि कौटुंबिक सहकार्याचा अभाव हे सर्वात मोठे आव्हान आहे. जर महिला म्हणून  उद्योगिनींवर अधिक विश्वास ठेवला तर काहीही त्यांना रोखू शकत नाही.

महिला सुरक्षा :





महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना केल्या तर व्यवसायात महिला अधिक प्रमाणात प्रवेश करू  शकतात. अधिक  समावेशक, भेदभाव नसलेले आणि सुरक्षित कामाच्या वातावरणाची आवश्यकता आहे विशेषत:  तंत्रज्ञान क्षेत्रातील  पात्र महिला राखण्यासाठी. सार्वजनिक जागांच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्यासाठी  उपाय आवश्यक आहेत, जेणेकरून स्त्रिया त्यांच्या सुरक्षिततेबद्दल नेहमीच काळजी न घेता,  मानसिक भार  न घेता  घर  आणि  कार्यालय दरम्यान प्रवास करू  शकतात. 

महिलांच्या उद्योजकतेचे सबलीकरण करणे गरजेचे आहे. व्यवसायात महिलांना संधी निर्माण करण्यास वरील घटक महत्वाचे आहेत. हे मूलभूत घटक आहेत जे भारतीय स्त्रियांना व्यवसायात यशस्वी होण्यास मदत करतात.

तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचला त्याबद्दल मनापासून आभारी आहे. 

अशा अनेक विषयवार अधिक जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी  आणि समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि community join करा.  

Join Community

You can also watch :