Monday, November 9, 2020

कार्यक्षमता वाढवण्यासाठी ७ शक्तिशाली मूलमंत्र


ठरवलेली कामं वेळेत होत नाहीत का? वेळ कुठे जातो कळतच नाही, काम पण पूर्ण होत नाही का ? वेळेचा सदुपयोग कसा करावा कळत नाही ? कामाची चालढकल होत आहे का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे सात मूलमंत्र देणार आहे त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.

लक्षात ठेवा time हा limited resource आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता त्याचा सदुपयोग करायलाच हवा. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे आत्ताच वेळेचा योग्य वापर करून तुमची कार्यक्षमता वाढवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचे मूलमंत्र:

१. जागरूकता ( Awareness) :-


जागरूकता नसणे हा कार्यक्षमतेसाठी हानीकारक गुण आहे. जागरूकता वाढवणे सोपे आहे त्याचा तुमच्या फायद्यासाठी वापर करून घ्या. तुम्ही कुठे आहात काय करत आहात या बद्दल जागरूक रहा. आपण कोणत्या वातावरणात आहे त्याबद्दल जागरूकता ठेवा. एखाद्या शांत ठिकाणी जिथे कोणाचाही डिस्टर्ब होणार नाही अशी जागा शोधा आणि तिथे काम करायला बसा. तुम्हाला तुमचे विचार त्रास देत आहेत का यावर लक्ष द्या. मन विचलित असेल तर meditation करा आणि कामावर focus करा. 
आपल्यामध्ये होणाऱ्या बदलाचे मूळ जागरूकतेमध्ये आहे. 

२. निमित्त सांगू नये  ( Excuse देऊ नये ) :-


प्रत्येक excuse मागे भिती लपलेली असते. बरेचदा आपण निमित्त सांगतो. जसे की मला हे काम करायचं होते पण मूड नव्हता किंवा मी दुसऱ्या कामात busy होतो म्हणून करू शकलो नाही. मला exercise करायची असते पण वेळ मिळत नाही. असे बरेच excuses असतात. पण असे बोलून आपण negative beliefs set करत असतो आणि त्या negative beliefs मुळे आपले काम होत नाही. त्यामुळे excuse देवू नयेत.  जेव्हा आपण excuse देतो तेव्हा जास्त power आणि focus त्या excuse ला देत असतो. आणि जिथे आपला focus जातो तिकडे energy flow होते आणि तसेच results आपल्याला मिळतात. 
यशस्वी लोक कधीच excuse देत नाहीत.

३. जबाबदारीपूर्ण वेळेचा सदुपयोग :- 


एखादे काम करत असताना जबाबदारीने वेळेचा सदुपयोग करा. प्रत्येक काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्या. प्रत्येक कामाला वेळ द्या आणि मध्ये मध्ये check करा आपले काम वेळेत होईल का? उदा. एखाद्या कामाला १ तास वेळ दिला असेल आणि त्यातील आता अर्धा तास शिल्लक असेल तर कामाची गती वाढवा. कामावराचा focus वाढवा. तुमच्या कामाची गती शोधा. तुमचा कामाचा पॅटर्न शोधा आणि त्याप्रमाणे काम करा. काही लोक सकाळी खूप active असतात. काही लोकांचे दुपारी छान काम होते. तुमचे काम कोणत्या वेळेत जास्त होते ती वेळ शोधा आणि त्याप्रमाणे कामाची आखणी करा. 
शक्यतो महत्वाची कामं सकाळीच करून घ्या. कारण जसा दिवस जातो तशी आपली energy पण कमी होवू लागते आणि कामाची इच्छाशक्ती हळू हळू कमी होते. 

४. तुमचा नित्यक्रम ठरवा :-


कार्यक्षमता वाढवण्यासाठी पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे. ६ ते ७ तास झोप घेतल्याने आपली कार्यक्षमता आणि creativity  वाढते. मेडिकल research मध्ये हे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर दैनंदिन कामं रोजच्या रोज करणे गरजेचे आहे. तुमचे रोजचे routine set करा. जसे की सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, पुस्तकं वाचणे. Routine set केल्याने आपण track वर राहण्यासाठी आणि कार्यक्षम राहण्यासाठी मदत होते. यामुळे चांगल्या सवयी लागतात. आणि काम करण्यासाठी उत्साह वाढतो. 

५.दैनंदिन कामाची आखणी करा (Organize activities) :-


बेंजामिन फ्रँकलिन यांनी सांगितले आहे 
"If you fail to plan , you plan to fail" 
आपला brain computer प्रमाणे असतो, एका वेळी जास्त applications open केल्या तर hang होतो. असे होवू नये यासाठी खालील ५ स्टेप्स वापरा.
    १. collection - तुमच्या डोक्यात असणारी सगळी कामं  लिहून काढा. त्याची लिस्ट बनवा.
    २. Processing - जी लिस्ट बनवली आहे त्यामध्ये प्रत्येक कमासमोर suggesting solution लिहा. 
        उदा. लिस्ट मध्ये Exercise असेल तर त्या समोर morning- १२ सूर्यनमस्कर, ५ ओमकार असे लिहू शकता. 
    ३. Organize -  जी कामं लिहिली आहेत ती priority प्रमाणे लिहा. आणि एक एक करून पूर्ण लिस्ट                        complete करून टाका.
    ४. Review - तपासून बघा. चुकून एखादे काम राहिले असेल तर ते add करा.
    ५. Do it - ठरवल्या प्रमाणे काम करायला सुरुवात करा. 

६. प्रत्येक काम संपल्यावर ते साजरे करा. ( Celebrate Success) :-
बनवलेल्या schedule प्रमाणे काम पूर्ण झाल्यावर त्या कमापुढे टिक ✔️ करा. मध्ये मध्ये ही लिस्ट चेक करत रहा.  अशा प्रकारे positive validations केल्याने आपल्याला कार्यक्षमतेची सवय लागून जाते. 
त्याचबरोबर काम पूर्ण होण्यासाठी काही छोट्या छोट्या अटी घाला. जसे की हे काम पूर्ण झाल्यावरच मी जेवण करेन. काम पूर्ण करूनच टीव्ही बघेन.  त्याचसोबत काम पूर्ण झाल्यावर स्वतःला rewards द्या. जसे की काम पूर्ण झाल्यावर मी मित्रासोबत बाहेर जाईल. Resturant मध्ये जेवायला जाईल. असे स्वतःला rewards देवू शकता. नैसर्गिक रीत्या आपला मेंदू पुरस्कार (reward) शोधत असतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद ही मिळत असतो त्यामुळे ते मिळवण्यासाठी आपण काम पूर्ण करतो. अशा प्रकारे प्रत्येक यश साजरे करा. 

७. चालढकल (Procrastination ) :-


कामाची चाल-ढकल करू नये हे आपण नेहमी ऐकत असतो. चालढकल म्हणजे procrastination हे दोन प्रकारचे असते. 
        १. Active Procrastination - 
यामध्ये ठरवून जी कामं कमी महत्वाची आहेत ती नंतर करा. अशा कामांना procrastinate करा. उदा. तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करत आहात आणि तेव्हा कोणाचा कॉल आला तर कॉल attend करू नका. हातात असलेले काम पूर्ण करून मग त्या व्यक्तीला call back करा. असे केल्याने महत्वाच्या कामावर focus करता येतो आणि ते काम पटकन होवून जाते. Active Procrastination हे कार्यक्षमता वाढवते. 

       २. Passive Procrastination :-
हे कार्यक्षमता कमी करते. यामध्ये सगळ्याच कामाची चालढकल केली जाते. त्यामुळे महत्वाची कामं पण पूर्ण होत नाहीत.
कामाची चाल ढकल टाळण्यासाठी प्रत्येक कामाला deadline द्या.
जे काम चालू केले आहे ते पूर्ण करा.

अशा प्रकारे हे ७ मूलमंत्र तुम्ही वापरले तर नक्कीच तुमची कार्यक्षमता वाढेल. याचा नक्की अनुभव घ्या. वेळे एवढं महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. बाकी कोणतीही गोष्ट परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ परत येत नाही त्याचा सदुपयोग करून आपण आपली कार्यक्षमता वाढवणे खूप महत्वाचं आहे.

तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.... 

अशा अनेक विषयवार अधिक जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आणि समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि community join करा.  

38 comments:

  1. हा ब्लॉग खरोखर खुपच महत्त्वाचा आहे
    सगळ्यांच्या बाबतीत हे इशू आहेत...
    फार सुंदर असे solution मिळाले आहे
    आणि खूप सुंदर व समजेल आसे एक्सप्लेन केले आहे
    त्यामुळे खरोखरच कार्यक्षमता वाढेल... हा विश्वास निर्माण झाला...
    Thank you अमृता ब्लॉग वरून एनर्जी मिळाली
    Thank you so much...!

    ReplyDelete
  2. खूपच छान लिखाण
    सगळ्यांनाच उपयोग होईल याचा

    ReplyDelete
  3. Very informative blog Amruta. Nicely addressed the issue and given practical solutions. Attractive pictures.

    ReplyDelete
  4. Very Informative, Useful & Effective Tips, Thanks a lot 🙏

    ReplyDelete
  5. Very Informative, Useful & Effective Tips, Thanks a lot 🙏

    ReplyDelete
  6. You will go ahead and achieve maximum,I am sure about that. Blog is effective, creative use of pictures.

    ReplyDelete
  7. खुप खुप सुंदर,
    प्रत्येकाला उपयोगी असा blog ....

    ReplyDelete
  8. अतिशय छान blog झालाय 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  9. Mast info dili... Hech hote kaam krtana.. Solution Pan chhan.. Nkki krel.. Thx

    ReplyDelete
  10. So nice..last week was procastination
    I will improve thank u made me realise

    ReplyDelete
  11. Beautifully written article. Very useful

    ReplyDelete
  12. खुप सुंदर लिखाण सगळ्यांसाठी उपयोगी अशी माहिती👌🏻👌🏻

    ReplyDelete
  13. More useful, खुपच छान Explained

    ReplyDelete
  14. Khupach chan blog very useful... Thank you so much ma'am

    ReplyDelete
  15. Khup chan lihale ahes..ha blog khup upayogi saglyan sathi.nice information thanku so much🍫👌..kavita

    ReplyDelete
  16. अमृता खूप छान mahiti. Agadi muddesud mandani. All related points coveted

    ReplyDelete
  17. Khoop chan specialy to do list topic refresh zala Kahi nawin ideas milalya. Thanx for adding new knowledge in our memories regularly 👍👍👍

    ReplyDelete