Goal achievement : ध्येय साध्य करून ध्येयपुर्तीचा आनंद मिळवून देणारे अत्यावश्यक घटक (Elements)
ध्येयपूर्तीचा आनंद सगळ्यांनाच हवा असतो. प्रत्येकाची काही ना काही ध्येयं असतातच जी आयुष्यात साध्य करायची असतात. तुमची देखील काही ध्येयं आहेत का? तुम्हाला देखील ध्येयपुर्तीचा आनंद घ्यायचा आहे का? ती साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? काय म्हणता ? हो... चला तर मग आज आपण जाणून घेऊ ते ५ महत्वाचे घटक, त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.... आपली ध्येयं आपल्याला प्रेरणा देणारी असली पाहिजेत आणि त्यांचे खूप महत्त्व असले पाहिजे कारण आपण ध्येयं शेवटपर्यंत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे . आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे आपल्याला ध्येयं पूर्ण व्हावी असे वाटते परंतु , ध्येयं ठरविणे आणि पूर्ण करणे या दरम्यानचा प्रवास कठीण आहे आणि तो पार करणे कठीण जाते . ध्येय एकतर अल्प मुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचे असू शकते , परंतु time frame काहीही असो , आपल्याला ते खऱ्या अर्थाने हवे असेल तर ते साध्य करण्यासाठी action plan तयार करावा लागेल . आपली प...