Friday, January 1, 2021

७ महत्त्वाच्या self improvement टिप्स ज्या २०२१ मध्ये यश मिळवून देतील





नवीन वर्षाची सुरवात स्वतःच्या डेव्हलपमेंट पासून केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.
स्वतःमध्ये सुधारणा केल्या शिवाय आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकत नाही. स्वतःमध्ये सुधारणा केल्यामुळे आपल्या आयुष्याची quality सुधारते या माझ्या मतासोबत तुम्ही सहमत आहात का?
नवीन वर्षात  self improvement  करून तुम्हाला यशस्वी वाटचाल करायची आहे का?
तुमचे उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.   चला तर मग जाणून घेऊ त्या सात गोष्टी ज्या  अंमलात आणून Self improvement करु शकतो.

१. ध्येय लिहा आणि रोज वाचा :-



ध्येय निश्चित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर आपलं काही ध्येय नसेल तर आयुष्य समुद्रात भरकटलेल्या नावे सारखे बनून जाते, ज्याला कुठे पोहोचायचे आहे हेच माहीत नसते. ध्येय फक्त विचारात असून उपयोग नाही. फक्त विचार करून ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. ध्येय पूर्ण करण्यासाठी discipline , consistency आणि planning खूप गरजेचे आहे. Proper planning आपले ध्येय पुर्ण करण्यासाठी जरुरी आहे. Planning करण्यासाठी सगळ्यात आधी ते लिहिणे गरजेचे आहे. तुमची ध्येयं लिहा आणि ती रोज सकाळी वाचा. रोज चेक करा की तुम्ही ध्येयाच्या दिशेने जात आहे का? रोज  ध्येयाच्या दिशेने एक एक ऍक्टिव्हिटी करत राहिला तर एक दिवस ते ध्येय पूर्ण होईल. जोपर्यंत तुमचे ध्येय विचारातून बाहेर काढून लिहित नाही तोपर्यंत ते केवळ एक स्वप्न असते. त्यामुळे ध्येय लिहा, कारण असे केल्याने ध्येय आपल्या लक्षात राहते आणि आपलं मन आपल्या ध्येयाप्रती दृढ बनते.

२. रोज नवीन काहीतर शिका :- 


जी गोष्ट comfortable वाटते तीच गोष्ट आपण करत राहतो. पण अशाप्रकारे एकाच गोष्टीला धरून बसलो तर आपली प्रगती होणार नाही. आतापर्यंत जे करत आलो आहोत तेच करत राहिलो तर आज जे result आहेत तेच मिळतील पण जर तुम्हाला वेगळे result हवे असतील तर नवीन गोष्टी शिकायला हव्या. त्यासाठी आपण रोज काहीतरी नवीन शिकत राहायला हवे. रोज काहीतरी शिकत राहिल्याने आपल्याला यश मिळते आणि प्रगती होत राहते.

असं म्हणतात की जे लोक रोज काहीतरी नवीन वाचतात किंवा शिकतात त्यांची बुद्धी जास्त चांगल्या प्रकारे काम करते. रोज काहीतरी नवीन शिकण्यात बिझी राहिला तर नवीन काही शिकायला तर मिळतेच आणि त्याचा आपल्याला आपल्या कामात देखील उपयोग होतो. रोज शिकत राहिल्याने आपण active राहतो आणि आपल्या ज्ञानात भर पडते.

३. Challenges accept करा :- 


प्रत्येकाला सुखी आणि आनंदी जीवन हवं असतं. अडचणींचा किंवा दुःखाचा सामना करायला लोक घाबरतात. पण जर अडचणींचा सामना केला नाही तर आपली प्रगती होऊ शकणार नाही. जीवनात चॅलेंजेस येत असतील तर त्यांना घाबरून न जाता त्याचा सामना कसा करता येईल याचा विचार करा. जेव्हा challenges accept करून त्याचा सामना करतो तेव्हा आपण एक प्रकारे भीतीवर विजय मिळवतो. 


एखाद्या गोष्टीचा चालेंज म्हणून स्वीकार करून त्यावर मात केली तर त्यानंतर मिळणारा आनंद वेगळाच असतो आणि त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण मिळते जी कायम लक्षात राहते आणि त्याचा आपल्याला इतर गोष्टी हँडल करण्यासाठी देखील उपयोग होतो. म्हणूनच आपण challenges accept करून त्यावर मात करून पुढे जायला हवे.


४. समविचारी सकारात्मक लोकांसोबत रहा :-


पाच वर्षानंतर आपण कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे तुम्ही कोणती पुस्तके वाचता आणि तुम्ही कोणा सोबत राहता. आपण कोणत्या लोकांसोबत राहतो हे खूप महत्त्वाचे आहे. जर प्रगती करायची असेल तर सकारात्मक समविचारी लोकांसोबत राहायला हवे. 
आपल्याकडे एक म्हण देखील आहे संगत गुण सोबत गुण. आपण कोणाच्या संगतीत आहोत याचा आपल्यावर फार परिणाम होत असतो. चांगला परिणाम हवा असेल तर संगत देखील चांगली असायला हवी. 


सकारात्मक लोक नेहमी आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. अडचणीच्या काळात moral support देतात. त्याचा आपल्याला फार उपयोग होतो. सकारात्मक लोकांसोबत राहिल्याने आपल्या विचारसरणीमध्ये देखील फरक पडतो. त्यामुळे नेहमी चांगल्या विचारसरणीच्या सकारात्मक लोकांसोबत रहा.


५. शारीरिक आणि मानसिकरीत्या सुदृढ रहा:-


शारिरिक रित्या तंदुरुस्त राहिला तर कोणतेही काम करण्यास नेहमी उत्साही राहाल आणि उत्साहाने काम केल्याने ते काम चांगले होईल आणि त्यात यश मिळण्याचे चान्सेस जास्त राहतील. शारीरिकरित्या सुदृढ नसलेला व्यक्ती कामाप्रती निरुत्साही असतो. त्यामुळे काम चांगल्या प्रतीचे होत नाही. शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्य देखील महत्त्वाचा आहे.


लक्षात ठेवा कोणतेही लक्ष पूर्ण करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य जास्त जरुरी आहे. जर तुम्ही मनानी हरला तर कोणत्याही युद्धात विजय मिळवू शकत नाही. मानसिक दृष्ट्या शक्तिशाली होण्यासाठी meditation खूप फायद्याचे आहे. रोज व्यायाम करणे जरुरी आहे. त्याच सोबत चांगल्या पुस्तकांचे वाचन देखील गरजेचे आहे.


६. सुधारणा करत रहा :-


कोणत्याही कामात पहिल्या प्रयत्नात यश येत नाही. त्यासाठी आपल्याला सुधारणा करत राहिले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात प्रगती होण्यासाठी feedback खूप जरुरी आहे. feedback घेऊन कोणत्याही कामात अधिक सुधारणा करू शकता. जीवनात पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी feedback घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. 


Positive feedback मिळाल्यावर आपल्याला आनंद होतो, पण negative feedback हा positive feedback पेक्षा जास्त constructive असतो. त्यामुळे तो positively घेऊन आपल्या मध्ये सुधारणा करत राहिले पाहिजे. आपल्या मध्ये ज्या कमी आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही तोपर्यंत त्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही आणि प्रगती होणार नाही. त्यासाठी आपल्या मध्ये ज्या कमी आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत. त्यावर काम केले पाहिजे तरच आपली प्रगती होऊ शकते.


७. Distraction पासून दूर रहा :-


सध्याच्या काळात खूप प्रकारचे distractions आहेत जसे की सोशल मीडिया, फोन कॉल्स, मेल चेकिंग, टीव्ही, Video games. या सगळ्या गोष्टींमुळे आपण कामावर पूर्णपणे फोकस करू शकत नाही. लोकांचा खूप वेळ सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात आणि चेक करण्यात जातो. Distraction मुळे productivity कमी झाली आहे. Creativity कमी होत आहे. जर आपण Distraction free राहून काम केले तर काम चांगल्या प्रतीचे होऊ शकते. जेव्हा आपण मध्ये मध्ये फोन चेक करतो, मेसेज चा रिप्लाय देतो त्यामध्ये 20 ते 30 टक्के वेळ वाया जातो आणि फक्त सत्तर ते ऐंशी टक्के वेळ कामावर देऊ शकतो.  शंभर टक्के वेळ कामावर देऊ शकत नाही त्यामुळे कामाची quality कमी होते. Productivity कमी होते. चांगले काम करण्यासाठी  Distraction free राहून काम करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा स्वतःमध्ये सुधारणा केल्या तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. 

अशाप्रकारे तुम्ही या सात गोष्टी लक्षात घेऊन त्यावर काम केले तर नक्कीच self-improvement होईल आणि 2021 हे वर्ष तुमच्यासाठी यश मिळवून देणारे वर्ष बनेल.


तुम्ही हा लेख पूर्ण वाचला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.

अशा अनेक विषयवार अधिक जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आणि समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि community join करा.  

Join Community

  

You can also read -



9 comments:

  1. वा, खूपच अप्रतिम ब्लॉग
    ही सप्तपदी अवलंबून आपण उत्कर्षाची शिखरं नक्कीच गाठू शकतो.

    ReplyDelete
  2. खूपच महत्वपूर्ण टिप्स मिळाल्या
    धन्यवाद अमृता मॅडम...!

    ReplyDelete
  3. खूप छान अमृता . दुसरा पॉईंट खूप आवडला . आपण खूपदा त्याच त्याच कंफोर्ट झोन मध्ये राहायला बघतो . पण नवीन शिकत राहिलो तर यातून नक्कीच बाहेर पडू . 👍

    ReplyDelete
  4. 7 self improvement tips प्रत्येकाला उपयोगी पडतील अशा आहेत खूप छान ब्लॉग

    ReplyDelete
  5. खुपच छान आणि informativeटिप्स अशा टिप्स वाचल्यामुळे यशाचे मार्ग सोयीस्कर होतात
    Thank You Amruta 🙏

    ReplyDelete