दृष्टिकोन बदलून यशस्वी होण्यासाठी ७ शक्तिशाली धोरणे
जे लोक बुद्धिमान आहेत , हुशार आहेत तेच लोक यशस्वी होऊ शकतात असे तुम्हाला वाटते का ? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं मत हेच असेल जर बुद्धिमान असेल तरच यश मिळेल . पण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनामुळे तुमचं हे मत नक्कीच बदलेल . मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांच्या एका संशोधनाप्रमाणे दृष्टिकोनावरून (Attitude) आपल्या यशाची भविष्यवाणी करता येते . त्यांच्या मते लोकांच्या दृष्टिकोनाचे दोन प्रकार आहेत . १ . Fixed Mindset २ . Growth Mindset Fixed Mindset असणारे लोक असे समजतात की मी असाच आहे . मी बदलू शकत नाही . मी एवढच करू शकतो . असा त्यांचा belief असतो त्यामुळे ते आयुष्यात जास्त पुढे जाऊ शकत नाहीत . जे आहे त्यात समाधान मानून तसेच आयुष्य जगत राहतात . दुसऱ्या बाजूला ज्यांचा growth mindset असतो त्यांचा विश्वास असतो की प्रयत्न करून ते सुधारणा करू शकतात . साधारण बुद्धिमत्ता असूनही ते fixed Mindset असणाऱ्या लोकांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी करतात कारण ते आव्हाने स्वीकारतात आणि त्यांना ...