जे लोक बुद्धिमान आहेत, हुशार आहेत तेच लोक यशस्वी होऊ शकतात असे तुम्हाला वाटते का ? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं मत हेच असेल जर बुद्धिमान असेल तरच यश मिळेल. पण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनामुळे तुमचं हे मत नक्कीच बदलेल. मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांच्या एका संशोधनाप्रमाणे दृष्टिकोनावरून(Attitude) आपल्या यशाची भविष्यवाणी करता येते. त्यांच्या मते लोकांच्या दृष्टिकोनाचे दोन प्रकार आहेत.
१.
Fixed Mindset
२.
Growth Mindset
Fixed Mindset असणारे लोक असे समजतात की मी असाच आहे. मी बदलू शकत नाही. मी एवढच करू शकतो. असा त्यांचा
belief असतो त्यामुळे ते आयुष्यात जास्त पुढे जाऊ शकत नाहीत. जे आहे त्यात समाधान मानून तसेच आयुष्य जगत राहतात.
दुसऱ्या बाजूला ज्यांचा
growth mindset असतो त्यांचा विश्वास असतो की प्रयत्न करून ते सुधारणा करू शकतात. साधारण बुद्धिमत्ता असूनही ते
fixed Mindset असणाऱ्या लोकांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी करतात कारण ते आव्हाने स्वीकारतात आणि त्यांना संधी मानतात.
खरंतर यश हे आपण अपयशासोबत कसे डील करतो यावर अवलंबून असते. Growth Mindset चे लोक failure handle करताना असे विचार करतात की ही method work करत नाही तर मी दुसरी method try करतो. मी problem solver आहे, मी यावर मार्ग काढणारच असा विचार करून ते त्यावर मात करतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल growth mindset कसा आणायचा? growth Mindset develope करू शकतो का?
हो, आपण growth mindset develop करून आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी काही स्ट्रॅटेजी आहेत त्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा. Growth Mindset वाढवण्यासाठी खालील धोरणे वापरा.
१. असहाय्य ( Helpless) वाटून घेऊ नका :-
जेव्हा अपयश येते तेव्हा असहाय वाटू लागते पण हाच परीक्षेचा क्षण असतो अशावेळी आपण असहाय्य वाटून हार मानायची की अजून जास्त प्रयत्न करून त्यावर मात करायची हे केवळ आपल्याच हातात असते. यशस्वी लोकांची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी अपयश आल्यावर हार न मानता अपयशावर मात करून भरघोस यश मिळवले आहे. उदा. वॉल्ट डिस्ने यांना कल्पनेची कमतरता आहे या कारणावरून कॅन्सस सिटी स्टार मधून काढून टाकण्यात आले होते. तसेच ओप्रा विन्फ्रे यांना टीव्ही anchor च्या जॉब वरून काढून टाकण्यात आले होते. हेनरी फोर्ड यांना देखील सुरुवातीला अपयश आले होते. विचार करा हे लोक fixed Mindset चे असते तर आज एवढे यशस्वी झाले असते का ? अपयश आले तरी त्यांनी आशा सोडली नाही. प्रयत्न करत राहिले. त्यांनी असहाय्य वाटून घेतले नाही कारण त्यांना माहित आहे की यशस्वी होण्यासाठी अपयशाचा सामना करावाच लागतो. त्यांच्या growth Mindset मुळेच ते यशस्वी होऊ शकले.
२. आवड जोपासा :-
सामर्थ्यवान लोक नेहमी त्यांच्या आवडीचा पाठलाग करतात. कदाचित प्रत्येक गोष्ट आपण प्रभावीपणे करू शकणार नाही. पण ज्या गोष्टींमध्ये आवड आहे त्यामध्ये आपण आपली प्रतिभा चांगल्या प्रकारे दाखवू शकतो. त्यासाठी आधी आपण आपली आवड ओळखली पाहिजे. कोणती गोष्ट आपण उत्कटतेने करू इच्छितो हे ओळखून त्यावर काम करत राहिले पाहिजे. कारण ज्यामध्ये आपली उत्कटता आहे त्यामध्ये उत्कृष्ट बनण्याचा आपण अविरत प्रयत्न करत राहतो. आपली खरी आवड ओळखण्यासाठी वॉरेन बफेट यांचे ५/२५ हे टेक्निक वापरू शकता. यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या 25
गोष्टी लिहायच्या आहेत. त्यातील 20 गोष्टी ज्या कमी आवडीच्या असतील त्यांना क्रॉस करा. उरलेल्या पाच गोष्टी आपल्या वास्तविक आवडी आहेत. या प्रकारे तुम्ही खरी आवड ओळखू शकता. अशा प्रकारे खरी आवड ओळखा आणि त्यावर काम करत रहा.
आपल्या आवडीच्या गोष्टींची लिस्ट काढून झाल्यावर त्यावर कृती करणे गरजेचे आहे.
Growth Mindset असणारे लोक इतरांपेक्षा खूप धैर्यवान असतात म्हणून ते भीतीवर मात करू शकतात असे नाही. त्यांना माहित असते की भीती किंवा चिंता या आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या भावना आहेत. त्यावर मात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृती करणे होय. कृती केल्याने आपण सर्व चिंता, भय याला सकारात्मक आणि
focused energy मध्ये convert करू शकतो.
आपण स्वतःच स्वतःला मर्यादा घालत असतो. तसे न करता आपण रोज आपल्या
capacity पेक्षा थोडे जास्त
efforts घेतले पाहिजेत. उदा. रोज आपण वीस मिनिट चालत असाल तर रोज पाच मिनिट
extra चाला यामुळे हळूहळू तुमची चालण्याची
capacity वाढेल. आपण काय करू शकतो शारीरिक किंवा इतर काहीही यावर आपण मर्यादा घालत असू तर त्या आपल्या इतर कार्यात, इतर सगळ्याच गोष्टीत येतात आणि त्यामुळे आपल्या प्रगतीवर देखील मर्यादा येतात. आपण अशा मर्यादा पार करून पुढे जायला हवे. त्यामुळेच आपली प्रगती होत असते. माणसाने नेहमी आपल्या पातळीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
५. परिणामांची अपेक्षा करा ( Expect results) :-
आपल्याला किती यश मिळायला हवे त्याची अपेक्षा करत रहा.
Growth Mindset असणाऱ्या लोकांना माहीत असते आपल्याला वेळोवेळी अपयश येऊ शकते. पण जोपर्यंत अपेक्षित यश मिळत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत. परिणामांची अपेक्षा केल्याने तुम्ही नेहमी
motivated राहता, empowered राहता. त्यासाठी नेहमी
result expect करा.
काही वेळा आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते. कोणतीही व्यक्ती एकटी यशस्वी होऊ शकत नाही.
Growth Mindset असणारे लोक इतरांना मदत करतात आणि इतरांकडून मदत घेण्यास संकोच ठेवत नाहीत. इतरांकडून मदत घेऊन आपण आलेल्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्यामुळे एकमेकांना मदत करून यशाचा प्रवास करत रहा.
७. तक्रार करू नका :-
तक्रार करणे हे fixed Mindset चे चिन्ह आहे. Growth Mindset चे लोक प्रत्येक गोष्टीत संधी शोधत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रारींसाठी जागा नसते. प्रत्येकास प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण growth mindset असणारे लोक प्रतिकूल परिस्थितीचा सुधारणा करण्याचे साधन म्हणून स्वीकार करतात. असे लोक आव्हानांचा सामना करून पुढे जातात.
अशा प्रकारे वरील ७ गोष्टींचा विचार करून प्रत्येक छोट्या गोष्टींना कसे respond करायचे याचा track ठेवून तुमच्यामध्ये growth mindset
develop करू शकता आणि तुम्ही याचा वापर केल्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल.
अशा अनेक विषयवार अधिक जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आणि समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि community join करा.
-अमृता मोरे
आत्मनिर्भर उद्योगिनी मार्गदर्शक
Fantastic Amruta ...
ReplyDeleteThank you sir 🙏😊
Deleteखुपच सुंदर आणि उपयोगी माहिती
ReplyDeleteअप्रतिम...!👍👍👍
Thank you 😊😍
DeleteGreat Amruta 👍👍 very nicely explain 💞💞
ReplyDeleteThanks dear 😊🙏
DeleteToo good Amruta
ReplyDeleteThank you 😊🤩
Deleteखूप छान 👍
ReplyDeleteThank you 😊🤩
Deleteखूप सुंदर मार्गदर्शन अमृता . Mast !
ReplyDeleteThank you 😊🤩
Deleteखूपच छान blog अमृता 👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌
ReplyDeleteThanks dear 😊🤩
DeleteVery fantastic nd powerful tips to keep ourselves motivated!!👌🏻👍🏻👍🏻
ReplyDeleteThanks dear 😊🤩
DeleteGreat Information Fantastic
ReplyDeleteThank u so much for guidance 🙏
ReplyDeleteYou have made lots of good changes in my life ❤️
🙏🙏🤩😊
DeleteActually all informations are good in social network but this information is touch direct in mind because of its present in short and sweet pattern.which actually demands in market.so this type writing is impact on mind and memory long life...very usefull so finally I say hats of blog writer.😊
ReplyDeleteThank u so much 🙏🤩
DeleteNice information Amruta
ReplyDelete👍👍
ReplyDeleteThank u ☺️🙏
Delete👍👍
ReplyDeleteखुप छान लिहिले आहेस अमृता
ReplyDeleteMind-blowing 👍
ReplyDeleteThank you sir 🙏😊
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery useful information. Result oriented. Bringing changes at the root level
ReplyDeleteKhup chan article..very useful information 👌🍫 KV
ReplyDeleteNice...🙏🙏
ReplyDeleteThank you 😊🙏
Deleteखूपच छान
ReplyDeleteThank you 😊🙏
Deleteखूपच सुंदर ब्लॉग अमृता
ReplyDeleteनेहमीच प्रमाणेच खूप छान मार्गदर्शन केलंस
Powerful, Guidance to everyone, Thank you so much👍
ReplyDelete