तुम्ही motivation घेऊन एखादे काम हातात घेतले आहे आणि काही दिवस ते केल्यानंतर focus कमी झाला, मग कामाचा स्पीड कमी होऊन आपल्याला जे करायचे आहे ते करू शकलो नाही हा अनुभव तुम्हाला आला आहे का?
एखादे काम हातात घेतल्यावर काही काळाने आळस येतो आणि ते काम पूर्ण होतच नाही असे तुमच्यासोबत होत आहे का ? असे जर असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला इच्छाशक्ती वाढवण्याचे ७ शक्तिशाली उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचा आळस एकदम पळून जाईल आणि तुमची productivity वाढेल. त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.
एखादे काम चालू करण्यासाठी मोटिवेशन हे महत्त्वाचे आहे पण फक्त मोटिवेशनने काही होणार नाही. मोटिवेशनचा इफेक्ट हळूहळू कमी होऊन तुम्ही पुन्हा मूळ पदावर याल. कामाची चालढकल चालू होईल. मोटिवेशन घेऊन देखील असे का होते, कारण मोटिवेशन सोबत इच्छाशक्ती देखील तेवढीच महत्वाची आहे. फक्त मोटिवेशनने तुम्ही काही करू शकत नाही. त्यासोबत इच्छाशक्ती असायलाच हवी. आता तुम्ही म्हणाल ही इच्छाशक्ती आणायची कुठून? इच्छाशक्ती नामक हिरा आपल्यामध्ये उपजतच असतो. फक्त आपल्याला त्याला पैलू पाडावे लागतात. प्रयत्नपूर्वक इच्छाशक्ती वाढवावी लागते. खाली दिलेले सात उपाय तुमची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतील.
१. आजचे काम आजच करा :-
कोणतेही काम आल्यावर आपण विचार करतो उद्या मला जास्त वेळ असेल तर मी हे काम उद्या करतो. पण लक्षात ठेवा उद्या कधीच येत नाही. या सवयीमुळे कामाची चालढकल होते. अशा प्रकारे कामाची चाल-ढकल होऊ नये यासाठी स्वतःला प्रश्न विचारा हे काम मी आजच कसे करू शकतो? आणि ते आजच करून टाका. तुम्ही काम पुढे ढकलत राहिला तर कामाचा load वाढेल आणि मग काम करण्याची इच्छा हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे आजचे काम आजच करा. म्हणतात ना," कल करे सो आज कर, आज करे सो अब".
२. स्वतःला Reward द्या :-
जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी रिवॉर्ड मिळणार असतो तेव्हा dopamine नामक केमिकल release होते आणि ते काम करण्यासाठी उत्साह वाढतो. त्यामुळे प्रत्येक काम (किंवा goal) संपवल्यानंतर स्वतः ला reward द्या. काम कम्प्लीट करण्यासाठी आणि motivated राहण्यासाठी हा उपाय करा. Dopamine detective बना आणि स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करा.
३. नियमित व्यायाम करा :-
व्यायामाचे अनेक फायदे आहेत. रोज व्यायाम केल्याने stress कमी होतो. व्यायामामुळे आपली एनर्जी दिवसभर टिकून राहण्यासाठी मदत होते. दिवसभर आपण ताजेतवाने राहतो. त्याचबरोबर unhealthy cravings कमी होतात. आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी व्यायामाची खूप मदत होते. त्यासाठी नियमित व्यायाम करा.
४. इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्या :-
आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला त्याप्रमाणे प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यासाठी आत्म जागरुकता (self awareness ) खूप महत्त्वाची आहे. Self awareness आपल्या इच्छा शक्तीला योग्य direction देते. रोज मेडीटेशन केल्याने self-awareness वाढतो. तसेच निर्णय क्षमता आणि आत्म निग्रह (self control ) वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे रोज मेडिटेशन (ध्यान) करणे खूप गरजेचे आहे.
५. आत्म निग्रहाला (self control) आव्हान द्या :-
एखाद्या गोष्टीची तुम्हाला जास्त craving होत असेल तर स्वतःला त्याचे तोटे काय आहेत ते सांगा. ती सवय सोडल्याने काय फायदे होणार आहेत ते मनाला पटवून द्या. छोट्या छोट्या गोष्टी ठरवून आपल्या craving ला नाही म्हणायला शिका. उदा. जर तुम्हाला स्वीट जास्त खाण्याची सवय आहे. ही सवय मोडायची आहे तर हे स्वीट येता-जाता समोर दिसेल अशा जागी ठेवा आणि स्वतःला चालेंज करा समोर दिसले तरी मी खाणार नाही. सुरुवातीला तुम्हाला थोडे खाण्याची इच्छा होईल, पण तुम्ही निग्रह करून रोज हे करायला चालू केले तर कालांतराने तुम्हाला स्वीट खाण्याची इच्छा कमी होईल. ती craving नाहीशी होईल. त्यामुळे तुमचा self-control develop होईल आणि इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मदत होईल.
६. शिस्तप्रियता (Self Discipline) :-
प्रत्येक successful व्यक्ती हा शिस्तप्रिय असतो. वैयक्तिक वाढ (personal growth) होण्यासाठी शिस्तप्रिय असणे खूप गरजेचे आहे. ज्याप्रमाणे biceps वाढवण्यासाठी त्याला एक लिमिट पर्यंत exert करावे लागते. रोज त्यावर काम करावे लागते, त्याप्रमाणे शिस्तप्रियता देखील वाढवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला शिस्तप्रिय होण्यासाठी मनाला देखील शिस्त लावावी लागेल. आळशीपणा घालवण्यासाठी मनाला शिस्त लावा. जर तुम्ही शिस्तप्रिय असाल तर जरी तुम्हाला थकवा किंवा कंटाळा आला असेल तरी तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी करालच. शिस्तप्रिय असल्याने कामं वेळच्या वेळी होतात आणि आपली इच्छा शक्ती वाढण्यास मदत होते.
७. विचारांवर कंट्रोल करा :-
आपण जसे विचार करतो तसे आपल्याला feel होते. जर आपण विचार केला की मी weak आहे तर तसेच वाटू लागते. एखादे काम करत असताना कधीकधी आपल्याला boring आणि dull वाटू लागते. ते काम करण्याची इच्छा राहत नाही, आणि अशावेळी आपल्याला जवळच्या फ्रेंडचा कॉल आला तर अचानक एकदम fresh वाटू लागते. तेव्हा आपल्याला dullness किंवा कंटाळा जाणवत नाही. क्षणात हा बदल कसा होतो? कारण थकवा किंवा कंटाळा असे काहीच नसते. ही आपल्या मनाने बनवलेली एक स्थिती असते. त्यामुळे आपल्या आवडीचा विषय आला की लगेच मूड चेंज होतो. आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे आपली maximum energy drain होते आणि काम करण्याची इच्छा कमी होते. हे होऊ नये यासाठी आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारावर कंट्रोल असणे गरजेचे आहे. प्रत्येक विचार हा पॉझिटिव्ह असला पाहिजे याची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या मनाला शिस्त लावणे गरजेचे आहे. मनाने आपल्यावर कंट्रोल करण्याआधी आपण मनावर कंट्रोल केले पाहिजे. कंटाळा येणे ही आपण बनवलेली मनाची स्थिती आहे हे ओळखून अशावेळी हा कंटाळा दूर फेकला पाहिजे आणि कामावर focus करायला हवे त्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल.
या ७ उपायांवर तुम्ही काम करत राहिला तर नक्कीच तुमची इच्छाशक्ती वाढेल. लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. जर तीव्र इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून इच्छाशक्ती वाढवण्यासाठी लगेच प्रयत्न चालू करा आणि तुमच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा.
तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचला त्याबद्दल मनापासून आभारी आहे.
अशा अनेक विषयवार अधिक जाणून घेण्यासाठी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आणि समविचारी लोकांच्या community मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि community join करा.
-अमृता मोरे
आत्मनिर्भर उद्योगिनी मार्गदर्शक
You can also read -
Khoop ch chan baryach goshti parat ekda refresh zalya...sagle point ekdam perfect aahet
ReplyDeleteBest👌👌👌👌asech Anmol margdarshan kayam rahu de...
Thanks Chetan...😊🙏
DeleteWonderful information..
ReplyDeleteWe need a teacher .group to stay motivated along with 7 tips
Thank you mam 😊
DeleteVery very useful and powerful tips to keep ourselves motivated 👏👏
ReplyDeleteKhup sundar Amruta,motivational
ReplyDeleteThanks Harshali 😊🙏
Deleteखूपच छान अमृता. Very useful tips 👌👌👌
ReplyDeleteThanks dear 😊🙏
DeleteVery important
ReplyDeleteNice blog.. Sagle mahiti aste Pan krt nahi.. Punha focus whayche.. Blog wachtana...push milale... Thx dear
ReplyDeleteActually... सगळ्यांचे तेच होते.. कळते पण वळत नाही...😂
Deleteखूप छान अमृता
ReplyDeleteअतिशय प्रेरणा आणि उत्साह देणारा ब्लॉग
Thanks dear 😊🤩
DeleteVery useful tips 👍👍
ReplyDeleteThanks you 😊🙏
Deleteखरंच खुप छान उपाय आहे...जी आजच्या जीवनशैलीत आपन उपयोग आनली तर छान पॉझिटिव परिवर्तन घडेल
ReplyDeleteThanku
नक्कीच... 👍😊
Deleteखूपच छान..
ReplyDeleteखूप सुंदर माहिती दिली
ReplyDeleteधन्यवाद...!
Thank you 😊🙏
DeleteVery nice amruta loved it.
ReplyDeleteKhup chan ma'am...Very useful blog...Thank you...����
ReplyDeleteThanks dear 😊🤩
Deletevery useful information.
ReplyDeletegreat maam
Khupach chhan..
ReplyDeleteThank you 🙏☺️
DeleteIncredible tips... Very useful. Thank you for sharing...
ReplyDeleteThank you Suyash☺️🙏
DeleteVery informative and actionable tips.. Superb Amruta...
ReplyDeleteThank you sir 😊🙏
Delete🤩🤩
ReplyDeleteThanks 😊🙏
Amruta khupach chan.... 👍
ReplyDeleteThank you 😊🙏
DeleteReally useful and powerful points
ReplyDeleteThank you 😊
DeleteVery nice and informative as well👍
ReplyDeleteThank you 😊🙏
DeleteVery nice information it creates positive attitude and motivation with self enthusiasm.
ReplyDeleteखूप छान आणि महत्त्वाची माहिती...
ReplyDeleteअमृता तुझे खूप खूप अभिनंदन...!
मला तुझा खूप अभिमान वाटतो
खूप खूप पुढे जा...
यशवंत हो...!!
Thank you so much Tai 😊🙏
DeleteKhup chan information dili ahes.point pn sagle mast 7 point khup👌👌
ReplyDeleteThank you 😊🙏
DeleteGood job
ReplyDeletehi dear , very well written in simple & impressive language...easy to understand...wish u all the best for future endeavor..
ReplyDeleteThank you so much... 😊🙏
DeleteIt's very important nd useful information.. #motivated
ReplyDeleteThanks dear 😊
Deleteखूप छान .. प्रेरणादायी आहे.
ReplyDeleteखूप छान .. प्रेरणादायी आहे.
ReplyDelete